आपुलकीने जोडलेले कौटुंबिक नाते हीच माझी ओळख.
देह मंदिर , चित्त मंदिर , एक तेथे प्रार्थना !
सत्य सुंदर परमेश्वराची नित्य ही आराधना !!
मुळातच समाजसेवीची आवड असल्याने मी व्यवसायही असा निवडला कि जेणे करून समाजाशी माझा नेहमीच सपंर्क राहिल.
प्रवासी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असताना आपणही समाजाचे काही तरी देणे आहोत या भावनेने तरुणांना रोजगाराच्या संधी , गरजूंना शैक्षणिक मदतीचा हात , समानतेची शिकवण देणारे धार्मिक उपक्रम , सामाजिक एकतेसाठी दहीहंडी , गणेशोत्सव , परंपरा जपणारे सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम त्याच बरोबर रक्तदान शिबीर , रोड सेफ्टी , स्वच्छता मोहीम , जेष्ठांसाठी सवलती या सारखे विधायक आणि सामाजिक उपक्रम राबविले आहेत .
आजपर्यंत केलेल्या समाज सेवेतुन आपणसोबत कौटुंबिक नाते निर्माण केले आहे . मी नेहमी समाजाला कुटुंब आणि कुटुंबाला समाज मानत आलो आहे . माझ्या समाजसेवेच्या कार्याला अधिक प्रकाशमची करण्यासाठी आपले प्रेम , स्नेह , सदिच्छा अशाच चापुढेडी त्रिकाल सोबत घाल अशी अपेक्षा बाळगतो .
समाजसेवा हीच खरी ईश्वरसेवा
ज्या प्रमाणे पहाटेच्या वेळी कोमणाने तेजोमयी होणाऱ्या सुर्याची ओळख करून द्यावी लागत नाही . त्याचप्रमाणे काही व्यक्तीचा परिचय हा केवळ त्यांच्या आग्मनाने चराचरातून होतो . असे व्यक्तिमत्व म्हणजे नेरूळ परिसराची मागील वर्षापासून समाजसेवा करणारे अतुलनीय असे प्रकाश खलाटे .
सामान्याचे जीवन जगणारा आणि सामान्यातून समाजसेवेला ईश्वरी सेवा मानून समाज सेवाकरणाऱ्या प्रकाश खलाटे यानी जनसेवा सुरू केलेला जागर आजह अखंडीतपणे आजही सुरू आहे . प्रकाश खलाटे यांच्या सारखे व्यक्तीमत्व आणि यशस्वी नेतृत्व नेरूळकरांना लाभले आहे आम्ही आमचे भाग्य समजतो .
समाजकारणात आलेल्या प्रकाश खलाटे यांच्या कार्याची दखल सर्वच राजकीय पक्षांनी घेतली आहे . त्यामुळे त्यांचे सामाजिक वलय अधिकच वाढले आहे . एक सामर्थ्यशाली , निष्ठेने काम करण्याची जिद्द अशी जिद्दीची कोनशिलाच प्रकाश खलाटे यांनी स्वःकतृत्वाने निर्माण केली आहे . त्यामुळेच त्यांच्या कडून अपेक्षा वाढल्या आहोत .