आपुलकीने जोडलेले कौटुंबिक नाते हीच माझी ओळख.
देह मंदिर , चित्त मंदिर , एक तेथे प्रार्थना !
सत्य सुंदर परमेश्वराची नित्य ही आराधना !!
मुळातच समाजसेवीची आवड असल्याने मी व्यवसायही असा निवडला कि जेणे करून समाजाशी माझा नेहमीच सपंर्क राहिल.
प्रवासी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असताना आपणही समाजाचे काही तरी देणे आहोत या भावनेने तरुणांना रोजगाराच्या संधी , गरजूंना शैक्षणिक मदतीचा हात , समानतेची शिकवण देणारे धार्मिक उपक्रम , सामाजिक एकतेसाठी दहीहंडी , गणेशोत्सव , परंपरा जपणारे सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम त्याच बरोबर रक्तदान शिबीर , रोड सेफ्टी , स्वच्छता मोहीम , जेष्ठांसाठी सवलती या सारखे विधायक आणि सामाजिक उपक्रम राबविले आहेत .
आजपर्यंत केलेल्या समाज सेवेतुन आपणसोबत कौटुंबिक नाते निर्माण केले आहे . मी नेहमी समाजाला कुटुंब आणि कुटुंबाला समाज मानत आलो आहे . माझ्या समाजसेवेच्या कार्याला अधिक प्रकाशमची करण्यासाठी आपले प्रेम , स्नेह , सदिच्छा अशाच चापुढेडी त्रिकाल सोबत घाल अशी अपेक्षा बाळगतो .