ग्राहक तक्रार निवारण मंचाकडून ग्राहकांच्या तकारी सोडविण्याचा प्रयत्न केला.
स्थानिक रहिवाशांच्या माहितीसाठी शासकीय मान्यताप्राप्त असलेले २०० रिक्षा टेरिफ कार्डाचे मोफत वाटप केले.
मराठी विज्ञान परिषद वाशीचे अध्यक्ष श्री. अ. मोहन भागवत यांनी आयोजित केलेल्या विज्ञानविषयक कार्यक्रमात सहभागी होऊन कचरा मुक्त, नवी मुंबई, सर्प प्रदर्शन, जैव तंत्रज्ञान, विज्ञान व मनोरंजन, आपले पर्यावरण इत्यादी विषयांची समाजपयोगी चर्चा केली.
लातूर किल्लारी भूकंपग्रस्तांसाठी मदत फेरीमध्ये सहभाग घेऊन सहकार्य केले.
नेरूळ सेक्टर १० मधील ( विजचा ) ट्रान्सफॉर्मर जळाला तेव्हा लोकाच्या सुरक्षिततेसाठी स्वतः जातीने प्रयत्न करून वीजपुरवठा पूर्ववत करून घेतला व मोठी ( जीवीत ) हानी टाळली.
नेरूळ सेक्टर -६ , मधील वसाहतीत अनाधिकृत चाललेली अती ज्वलनशील पदार्थांची विक्री थांबविण्यासाठी नेरूळ पोलिस स्टेशनच्या माध्यामातुन प्रयत्न केले.
अमराई झोपडपट्टी सेक्टर - ९ , नेरूळ येथील वसाहतीची सर्वेक्षण समस्या याबाबत तेथील कार्यकर्त्यांना बी-विभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सहकार्य करण्याची विनंती केली.
शासकीय योजना पल्स ( पोलीओच्या ) प्रत्येक मोहीमेत जनजागृती करण्यासाठी कार्यकर्त्यांसह घरोघरी संपर्क अभियान राबविले.
त्सुनामीग्रस्तांच्या , अतिवृष्टीच्या व आपादग्रस्तांच्या मदतीसाठी आयोजित केलेल्या मदतफेरीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन त्यांना मुलभूत सुविधा व अडी - अडचणी निवार्ण्यासाठी सहकार्य केले.
नवी मुंबईतील रिक्षा व टॅक्सी चालकांना व वारसांना परमीट मिळण्याबाबत योग्य मार्गदर्शन करून न्याय मिळवून दिला.
या शिवाय समाजातिल विविध क्षेत्रातील अनेक प्रश्नासाठी समाजपयोगी सहाकार्य , मार्गदर्शन अविरत सुरु असते.
प्रकाश खलाटे
प्रवासी चॅरिटेबल ट्रस्ट - व्यवस्थापकीय विश्वस्त, प्रवासी ट्रेनिंग स्कूल - संचालक